कोल्हापूर दि. ९ : जागतिक ग्राहक दिनानिमित्त येत्या १५ मार्च रोजी प्रबोधन आणि ग्राहक जागृती मेळावा घेण्याचा निर्णय अप्पर जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
दरवर्षी १५ मार्च हा दिन जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा या दिवशी ग्राहकांना त्यांचे हक्क आणि जबाबदार्या समजाव्यात यादृष्टीने कार्यक्रम आणि मेळाव्याचे आयोजन करावे असे अप्पर जिल्हाधिकारी धुळाज यांनी सांगितले.
हा मेळावा शाहू स्मारक भवन येथे सकाळी अकरा वाजता होणार आहे. मेळाव्यास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित रहावेत, असे नियोजन करण्याची सूचना श्री. धुळाज यांनी उपस्थितांना केली. या मेळाव्यास महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतील, याची काळजी घ्यावी. त्यासाठी बचत गटांच्या महिला सभासदांना निमंत्रित करण्याचे ठरले. जिल्ह्याप्रमाणेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणीही ग्राहक मेळावा घ्यावा, त्यादृष्टीने नियोजन करण्याचे तहसिलदारांना कळवावे, असे श्री. धुळाज यांनी सांगितले.
बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी संजय शिंदे, सहाय्यक पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, महानगरपालिकेच्या शारदा पाटील, ग्राहक पंचायतीचे संदीप जंगम, संजय हुकेरी, अनिल अनिखिंडी, विजय ओतारी, अॅड. ज्योत्सा डासाळकर आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.