रविवार, १८ मार्च, २०१२

इचलकरंजी जगाच्या नकाशावर - पालकमंत्री नियोजनबध्द विकासासाठी गुणवत्तापूर्ण काम आवश्यक

        कोल्हापूर दि. १८ : इचलकरंजी शहर आता जगाच्या नकाशावर आले आहे, त्यामुळे या शहराचा विकास अधिक नियोजनबध्द होण्यासाठी येथील प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज येथे केले.
      केंद्ग शासनाच्या एकात्मिक गृहनिर्माण आणि झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत जयभीमनगर आणि नेहरुनगर या ठिकाणच्या झोपडपट्टी घरकुलांच्या बांधकामाचा पायाभरणी आज त्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.
      यावेळी व्यासपीठावर गृहराज्यमंत्री सतेज पाटील, नगराध्यक्षा रत्नप्रभा भागवत, उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी खासदार निवेदिता माने, माजी मंत्री प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, प्रांताधिकारी तुषार ठोंबरे आदी उपस्थित होते.
      पालकमंत्री म्हणाले, केंद्ग शासनाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात इचलकरजीसाठी महत्वाच्या योजनेची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेमुळे इचलकरंजीसारख्या औद्योगिक आणि विकसित होत असणार्‍या नगरीचा चांगला विकास होईल. एकात्मिक गृहनिर्माण आणि झोपडपट्टी विकास योजनेमुळे समाजातील गरीब आणि मागास घटकांना हक्काचे घर मिळणार आहे ही आनंदाची बाब आहे.
      प्रास्ताविक नगराध्यक्षा रत्नप्रभा भागवत यांनी केले. यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी खासदार निवेदिता माने यांचीही भाषणे झाली. उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते यांनी आभार मानले.
      तत्पुर्वी, बांधकाम क्षेत्रासाठी आवश्यक असणार्‍या विविध प्रकारच्या कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स अ‍ॅण्ड आर्किटेक्टच्या वतीने आयोजित अ‍ॅडव्हान्स टेक्निक अ‍ॅण्ड बिल्डिंग कन्स्ट्रक्शनवर आयोजित चर्चासत्राच्‌ऋया उद्‌घाटनावेळी ते बोलत होते. सध्याची बाजारपेठ ग्राहकांची आहे. त्यामुळे ग्रामहकांचा विचार करुन त्यांना आवश्यक असणार्‍या सोयी सुविधांचा विचार करुनच गृहनिर्माण प्रकल्पांची बांधणी करावी, असेही पालकमंत्री पाटील म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.