कोल्हापूर दि. ३ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे यावर्षी ५१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या यंदा १८ केंद्गावर प्राथमिक फेरीत निवड झालेल्या नाटकांची अंतिम स्पर्धा ४ ते २१ मार्च २०१२ या कालावधीत कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात दररोज रात्रौ ९ वाजता होणार आहे.
नाट्य स्पर्धेच्या निमित्ताने कोल्हापूरच्या नाट्य रसिकांना ५१ व्या मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतील नाटकांचा आनंद घेता येणार आहे. उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्या कलागुणांमधून व्यक्तिमत्व विकास घडवून आणावा, नाट्य कलेचा प्रचार व प्रसार सर्वस्तरावरुन व्हावा, सांस्कृतिक वातावरण तयार व्हावे हा उद्देश ठेवून शासन राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन गेली पन्नास वर्षे करीत आहे. या स्पर्धेचा सर्व नाट्यप्रेमी कलावंतांनी व नाट्यप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक आशुतोष घोरपडे यांनी केले आहे.
केशवराव भोसले नाट्यगृहात ५१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी नाट्य महोत्सव २०११-१२ अंतिम मराठी स्पर्धेचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. दिनांकापुढे नाटकाचे नाव, कंसात लेखकाचे नाव व त्यापुढे सादरकर्ती संस्था दर्शविण्यात आली आहे.
४ मार्च २०१२ सटवाई आख्यान (नाथा चिथळे) तन्मय ग्रुप, नांदेड, ५ मार्च तिची पाचवी (डॉ. समीर मोरे) तिहाई कला स्पर्धक संस्था, डोंबिवली, ६ मार्च शिशिरर्तुच्या पुनरागमे (डॉ. स. ना. मोने) स्पंद, सोलापूर, ७ मार्च गुलमोहर (प्रशांत महाबळकर) वरदांबिका कला संघ फोंडा, गोवा, ८ मार्च आता पास (यतीन शिवाजी माझीरे) संक्रमण कोथरुड, पुणे, ९ मार्च काही क्षण आयुष्याचे (रोशन नंदवंशी) प्रभात चॅरिटेबल सोसायटी, अकोला, १० मार्च जिहाद (अमोल रेडिज) नेहरु युवा ऑल मुव्हमेंटस् रत्नागिरी, ११ मार्च क्षण एक पुरे प्रेमाचा (माधव भट) नवोदिता, चंद्गपूर, १२ मार्च सत्ता (वैभव मावळे) महाराणा प्रताप शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ, जळगाव, १३ मार्च प्यादी (मनोहर सुर्वे) मनोविकास स्पे. चिल्ड्रन एज्युकेशन सोसा. अमरावती, १४ मार्च मनमनास उमगत नाही ( समीर पेणकर) महानगरपालिका कर्मचारी कलावंत संस्था कलासाधना, मुंबई, १५ मार्च सोयर सुतक (अवधुत भिसे ( एकता ग्रुप, मुंबई, १६ मार्च तनया (गिरिष डावरे) बेस्ट कला आणि क्रिडा मंडळ, मुंबई, १७ मार्च अल्टर्स (मकरंद कुलकर्णी) आशय, कराड, १८ मार्च ब्लडी पेजेस, अश्वमेघ थिएटर्स नाशिक, १९ मार्च बापू एक खोज (प्रा. विलास पवार) अभिनय प्रतिष्ठानचे लोणेश्वर कला व क्रिडा मंडळ, लोणी हवेली, पुणे, २० मार्च आधार (अनिल काकडे) आदित्य प्रतिष्ठान, ठाणे आणि २१ मार्च २०१२ रोजी काळ्या मुलीचं मॅरिज (निरंजन मारखंडेवार) अॅडव्हान्टेज, नागपूर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.