कोल्हापूर दि. १६ : राज्याचे वने, पुनर्वसन व मदत कार्य आणि भूकंप पुनर्वसन मंत्री डॉ. पतंगराव कदम १७ मार्च २०१२ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि. १७ मार्च २०१२ रोजी सायं. ५-३० वाजता पलूस, जि. सांगलीहून शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. ६-३० वाजता शाहू सांस्कृतिक मंदिर, मार्केट यार्ड, कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरु डॉ. वसंत मारुती चव्हाण यांच्याकडील विवाह समारंभास उपस्थिती. ७ ते ७-४५ वाजेपर्यंत आशीर्वाद बंगला, रुईकर कॉलनी, कोल्हापूर येथे माजी खासदार निवेदिता माने यांचे निवासस्थानी राखीव. रात्रौ ७-४५ वा. कोल्हापूरहून सांगलीकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.