शुक्रवार, २ मार्च, २०१२

उद्यापासून कोल्हापुरात तांदूळ महोत्सव

      कोल्हापूर दि. २ : कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद, कोल्हापूर महानगरपालिका, करवीर आदर्श महिला औद्योगिक सह. संस्था, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ते ५ मार्च २०१२ या कालावधीत तांदूळ महोत्सव २०१२ चे आयोजन सासने ग्राऊंड, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे करण्यात आले आहे.
      तांदूळ महोत्सवाचे उद्‌घाटन कृषि व पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ३ मार्च २०१२ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. कामगार व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष बाबासाहेब कुपेकर, खासदार सदाशिवराव मंडलिक, कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार, महापौर कादंबरी कवाळे, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, महानगरपालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक डॉ. मधुकर घाग आदी उपस्थित राहणार आहे.
      उद्‌घाटन समारंभास कोल्हापूरवासियांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी उमेश पाटील, कृषि उपसंचालक सुधर्म जामसांडेकर, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी सुरेश मगदूम यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.