कोल्हापूर दि. ६ : राष्ट्रीय सहकारी विकास निगम, नवी दिल्ली यांच्या योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील यंत्रमाग, गारमेंट, निटिंग, प्रोसेसिंग सहकारी संस्था अशा एकूण २६२ संस्थांना भागभांडवल, कर्ज मर्जिन मनी अर्थसहाय्य वितरित करण्यात आलेले आहे.यंत्रमाग संस्थांना दिलेल्या अर्थसहाय्यापैकी वसुलपात्र भागभांडवल, कर्ज, व्याजाची रक्कम संस्था स्वतःहून देय शासकीय रक्कमेचे परतफेड करीत नसल्यामुळे यंत्रमाग, गारमेंट, निटिंग, प्रोसेसिंग सहकारी संस्थांना सोलापूरच्या प्रादेशिक उपसंचालक वस्त्रौद्योग कार्यालयाने नोटीसावजा पत्रे दिलेली आहेत. मागणीपत्र देऊनही संस्था शासकीय रक्कमा नियमित परतफेड करीत नाहीत, अशा सर्व संस्थांकडून सक्तीने शासकीय वसुली करण्यासाठी सदर संस्थांच्या संचालक मंडळास जबाबदार धरण्यात येऊन महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५५ अंतर्गत कारवाई करण्यात येईल याची सर्व संस्था पदाधिकार्यांनी नोंद घ्यावी असे प्रादेशिक उपसंचालक, वस्त्रोद्योग, सोलापूर यांनी स्पष्ट केले आहे.
प्रादेशिक उपसंचालक, वस्त्रोद्योग, सोलापूर हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून दि. १३ मार्च २०१२ रोजी सकाळी ११ वाजता इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन, एस. टी. स्टँडजवळ, इचलकरंजी येथे शासकीय वसुलीकरिता व योजनेबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व संस्थांच्या पदाधिकार्यांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.