शनिवार, १७ मार्च, २०१२

पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

         कोल्हापूर दि. १७ : सहकार व संसदीय कार्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील उद्या रविवार दि. १८ मार्च २०१२ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
           दि. १८ मार्च २०१२ रोजी पुण्याहून सकाळी ९-३० वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व कोल्हापूर जिल्हास्तरीय अधिकार्‍यांसमवेत बैठक. ९-४५ वाजता मोटारीने इचलकरंजीकडे प्रयाण. १०-३० वाजता इचलकरंजी येथे आगमन व राजीव गांधी सांस्कृतिक भवनात असोसिएशन ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्ट यांच्यामार्फत आयोजित सेमिनार-अ‍ॅडव्हान्स टेक्नीक्स इन बिल्डिंग कनस्ट्रक्शन कार्यक्रमास उपस्थिती. ११-१५ वाजता इचलकरंजी येथे झोपडपट्टी घरकुलाच्या बांधकामाचा पायाभरणी समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. ११-४५ वाजता इचलकरंजीहून कोल्हापुरकडे प्रयाण. दुपारी १२-२० वाजता कोल्हापुरातील सासने मैदान येथे आगमन व ताराराणी महोत्सव उद्‌घाटन समारंभास उपस्थिती. १-२० ते १-५० वाजेपर्यंत राखीव. १-५० वाजता कोल्हापुरहून मोटारीने पुण्याकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.