बुधवार, १४ मार्च, २०१२

स्थानिक स्वराज्य संस्थेतील महिला सदस्यांसाठी आज कार्यशाळा राज्य निवडणूक आयुक्त सत्यनारायण यांची उपस्थिती

कोल्हापूर दि. १४ : राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण कोल्हापूरच्या दौर्‍यावर येत असून त्यांच्या हस्ते उद्या दि. १५ मार्च २०१२ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेतील महिला सदस्यांकरिता प्रशिक्षण व जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उद्‌घाटन होणार आहे.
 राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य व कोल्हापूर जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती प्रशिक्षणांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेतील महिला सदस्यांकरिता प्रशिक्षण व जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा उद्या सकाळी साडेदहा वाजता श्री. शाहू सांस्कृतिक भवन, मार्केट यार्ड येथे आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेस पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्षा यशोदा कोळी, महापौर कादंबरी कवाळे, जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, महानगरपालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी दीड वाजेपर्यंत उद्‌घाटनपर सत्र होईल. दुपारच्या सत्रात स्वयंसिध्दाच्या अध्यक्षा कांचनताई परुळेकर, अन्नपूर्णा परिवारच्या अध्यक्षा मेघापूर्वा सामंत, दारुबंदी संघर्ष समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे, नाशिक जिल्ह्यातील किकवारे गावचे सरपंच केदा बारकू काकुळते यांची मार्गदर्शनपर भाषणे होणार आहेत.
या कार्यशाळेला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धैर्यशील माने आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.