मंगळवार, ६ मार्च, २०१२

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष कुपेकर यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

कोल्हापूर दि. ६ : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर दि. ७ मार्च २०१२ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दि. ७ मार्च २०१२ रोजी दुपारी ३ वाजता वास्को-गोवा येथून बांदा, सावंतवाडी, आंबोली, चंदगड मार्गे कानडेवाडी, ता. गडहिंग्लज येथे आगमन, राखीव व मुक्काम.
दि. ८ मार्च रोजी कानडेवाडी येथे राखीव व मुक्काम.
दि. ९ मार्च रोजी सकाळी १० वाजता उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथील कार्यक्रमास उपस्थिती. ११ वाजता जरळी, ता. गडहिंग्लज येथील विकास कामांचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १ ते सायं. ५ वाजेपर्यंत गडहिंग्लज येथील गांधीनगर हॉलमध्ये गडहिंग्लज येथील कार्यकर्त्यांचा मेळावा व विकास कामांबाबत चर्चा. त्यानंतर कानडेवाडी येथे राखीव व मुक्काम.
दि. १० मार्च रोजी कानडेवाडी येथे राखीव व मुक्काम.
दि. ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता कानडेवाडीहून मोटारीने शिनोली, ता. चंदगडकडे प्रयाण व शिनोली येथे भैरु खांडेकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थिती. ११-३० वाजता सुरुते, ता. चंदगड येथे मार्कडेय नदीवरील कोल्हापूर टाईप बंधार्‍याचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत चंदगड तालुक्यातील पाटणेफाटा येथे चंदगड येथील कार्यकर्त्यांचा मेळावा व विकास कामांबाबत चर्चा. त्यानंतर कानडेवाडी येथे राखीव व मुक्काम.
दि. १२ व १३ मार्च रोजी कानडेवाडी येथे राखीव व मुक्काम.
      दि. १४ मार्च रोजी सकाळी कानडेवाडी येथे राखीव. दुपारी ३ वाजता कानडेवाडीहून मोटारीने कोल्हापुरकडे प्रयाण. सायं. ६ वाजता कोल्हापूर येथे आगमन, राखीव व मुक्काम, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे. पुढील कार्यक्रम सोयीनुसार कळविण्यात येईल,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.