कोल्हापूर दि. १७ : राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर, महिला मंच आणि जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कोल्हापूर व व्ही. टी. पाटील फाऊंडेशन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. १९ मार्च २०१२ रोजी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत वसुंधरा महिला शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कोल्हापुरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा पाणलोट विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याचे उद्घाटन कोल्हापूर प्रेस क्लबच्या अध्यक्षा अनुराधा कदम यांच्या हस्ते होणार आहे. पुण्याचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्गजित देशमुख मार्गदर्शन करणार असून कोल्हापुरचे विभागीय कृषि सहसंचालक डॉ. मधुकर घाग प्रमुख पाहुणे तर कृषि उपसंचालक सुधर्म जामसांडेकर व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी उमेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा संपन्न होणार आहे.
मेळाव्यास बहुसंख्य महिलांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.