मंगळवार, ६ मार्च, २०१२

पुणे येथील कंपनीद्वारे ऑपरेटर पदासाठी कोल्हापुरात मुलाखतीद्वारे निवड करणार

     कोल्हापूर दि. ६ : एजीस लिमिटेड, चौथा व पाचवा मजला कॉमर्स झोन, येरवडा, पुणे येथील नामांकित कंपनीमध्ये ऑपरेटर या पदासाठी महिला व पुरुष अपंग अस्थिव्यंग उमेदवारांची उद्योजक स्वतः उपस्थित राहून मुलाखत घेणार आहेत. शैक्षणिक पात्रता दहावी व बारावी उत्तीर्ण, वयोमर्यादा १८ ते ३५ अशी आहे. सदरची कंपनी पुणे येथे असून रुपये ७३२० इतका एकूण पगार मिळणार आहे. नियुक्त्यांनी आपली निवड केल्यास पुणे येथे राहण्याची व्यवस्था स्वतः करावी लागणार आहे.
      इच्छुक फक्त अपंग अस्थिव्यंग उमेदवारांनी दि. १३ मार्च २०१२ रोजी सकाळी ११-३० वाजता रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्ग, पागा बिल्डींग, भवानी मंडप, कोल्हापूर येथील कार्यालयात खोली क्र. २ मध्ये मुलाखतीसाठी आपली मूळ कागदपत्रे घेऊन उपस्थित रहावे, असे आवाहन कोल्हापूरच्या रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्गाचे सहाय्यक संचालक गं. अ. सांगडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.