मंगळवार, ६ मार्च, २०१२

जागतिक महिला दिनानिमित्त गुरुवारी जिल्हास्तरीय मेळावा

        कोल्हापूर दि. ६ : जिल्हा प्रशासन, कोल्हापूर, महिला व बाल विकास विभाग, कोल्हापूर, आरोग्य विभाग व जिल्हा एड्‌स प्रतिबंध व नियंत्रण युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर येथे ८ मार्च २०१२ रोजी सकाळी १० वाजता जिल्हास्तरीय महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
       कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर सौ. कादंबरी कवाळे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय महिला मेळाव्याचे उद्‌घाटन होणार असून जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा संपन्न होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव, महानगरपालिकेच्या आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी-प्रसन्ना व महानगरपालिकेच्या महिला बाल कल्याण समितीच्या सभापती सौ. शारदा देवणे यांची प्रमुख उपस्थितीत राहणार आहे.
       कार्यक्रमास जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.