शुक्रवार, १६ मार्च, २०१२

कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

         कोल्हापूर दि. १६ : राज्याचे कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ दि. १७ मार्च २०१२ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
      शनिवार दि. १७ मार्च २०१२ रोजी सकाळी ७ वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व कागलकडे प्रयाण.७-३० ते १०-३० वाजेपर्यंत कागल येथे आगमन निवासस्थानी गाठीभेटी. ११ वाजता कागल येथील बिरुदेव मंदिर येथे कागल शहर धनगर समाजाच्या बैठकीस उपस्थिती. ११-३० वाजता शासकीय विश्रामगृह, कागल येथे शिवाजी पाटील, पांडुरंग मांडवेकर व श्री. तराळ यांच्या समवेत सावर्डे खुर्द येथील विकास कामाबाबत बैठक. दुपारी १२ वाजता कागलहून कोल्हापूरकडे प्रयाण. १२-३० वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. रात्रौ. ८ वाजता कागल येथील विश्वास सणगर यांच्याकडे राखीव. सोयीनुसार निवासस्थानाकडे प्रयाण व मुक्काम.
      रविवार दि. १८ मार्च रोजी सकाळी ७-३० ते ११ वाजेपर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. ११ वाजता कागलहून कोल्हापूरकडे प्रयाण. ११-३० वाजता सासने मैदान, कोल्हापूर येथे आगमन व स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजने अंतर्गत जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाच्या उद्‌घाटन सोहळ्यास उपस्थिती. सोयीनुसार पेठ वडगाव येथील प्रा. बी. के. चव्हाण यांच्या पुतण्याच्या विवाह समारंभास, कोल्हापूर येथील क्रांतीकुमार पाटील यांचेकडील  लग्न समारंभास आणि करवीर तालुक्यातील चिखली येथील रघुनाथ पाटील यांच्याकडील लग्न समारंभास उपस्थिती. दुपारी २ वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे नविद मुश्रीफ यांच्या समवेत चर्चा. सायं. ६ वाजता शाहू स्मारक भवन येथे जागर पुरस्कार वितरण समारंभास उपस्थिती. रात्रौ ८-३० वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.