कोल्हापूर दि. ३ : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार महालोकअदालतमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे सामोपचाराने व समझोत्याने मिटविण्यासाठी व न्यायालयात दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रकरणांचा जलद गतीने निपटारा होण्यासाठी ४ मार्च २०१२ रोजी कोल्हापुरातील जिल्हा न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच सर्व तालुका विधी सेवा समिती यांच्यामार्फत महा-लोकअदातचे आयोजन करण्यात आलेले आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश व्ही. आर. लोंढे यांच्या हस्ते सकाळी १०-३० वाजता लायब्ररी हॉल, जिल्हा न्यायालय, कोल्हापूर येथे महालोकअदालतचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमास सर्व न्यायाधिश व वकीलवर्ग उपस्थित राहणार असल्याची माहिती कोल्हापूरच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव योगेश राणे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.