कोल्हापूर दि. ९ : राज्याचे कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ आज ९ मार्च २०१२ रोजी सायं. ६ वाजता कागल येथे येत असून त्यांचा दि. १० मार्च २०१२ पासूनचा कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि. १० मार्च २०१२ रोजी सकाळी ७-३० ते ९-३० पर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. १० वाजता शासकीय विश्रामगृह, कागल येथे सावित्रीबाई फुले संस्थेच्या बैठकीस उपस्थिती. त्यानंतर ११ वाजता काळम्मा बेलेवाडी ता. कागल येथील प्रमुख कार्यकर्त्यांची शासकीय विश्रामगृह, कागल येथे बैठक. दुपारी १२-३० वाजता कोल्हापुरकडे प्रयाण. १ वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. सायं. ६ वाजता हातकणंगले तालुक्यातील आळते येथे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नवनिर्वाचित पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण व मुक्काम.
रविवार दि. ११ मार्च रोजी सकाळी ७-३० ते ९-३० पर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. ९-३० वाजता कोल्हापुरकडे प्रयाण. १० वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व एमआयडीसी मधील सर्व कंपन्यांच्या अधिकार्यांसमवेत बैठक. ११ वाजता कोल्हापूरहून मोटारीने पुण्याकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.