कोल्हापूर दि. १७ : सामान्य नागरिकांना कायद्याची माहिती व्हावी यासाठी गगनबावडा तालुक्यातील तिसंगी येथे १८ मार्च २०१२ रोजी सकाळी १०-३० वाजता कायदेविषयक शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
कोल्हापुरचे मुख्य न्यायदंडाधिकारी बी. सी. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली शिबीर होत असून यावेळी Rights of Transgenders या विषयावर न्या. एस. एम पाटील, शासकीय लोककल्याणकारी योजनाविषयी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय माने, माहितीचा अधिकार विषयी न्या. ए. बी. कुलकर्णी, महिला हक्क संरक्षण विषयी न्या. एच. एस. भोसले आणि शासकीय लोककल्याणकारी योजनाविषयी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे मार्गदर्शन करणार आहेत.
या कायदेविषयक शिबीराचा गगनबावडा तालुकावासियांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.