बुधवार, १ सप्टेंबर, २०२१

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त कुटूंबांना 10 हजार रूपये अनुदान

 


                कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय) : अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे ज्यांच्या घरामधील प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले आहे अशा कुटूंबांना 10 हजार रूपये प्रमाणे अनुदान वितरीत करण्याबाबत महसुल व वन विभाग यांच्याकडील शासन निर्णयानुसार करवीर तालुक्यासाठी प्राप्त झालेल्या अनुदानापैकी करवीर ग्रामीण हद्दीमधील 7 हजार 754 कुटूंबांना आणि शहर हद्दीमधील 5 हजार 46 कुटूंबांना त्यांच्या बँक खात्यावर 10 हजार रूपये इतकी रक्कम एनइएफटीव्दारे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

       उर्वरित 5 हजार 036 कुटूंबांच्या बँक खात्यावर सद्यस्थितीत 5 हजार इतके अनुदान एनइएफटीव्दारे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु आहे. उर्वरित 5 हजार रूपये इतके अनुदानदेखील शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर तात्काळ वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष तथा करवीर तहसिलदार शितल मुळे-भामरे यांनी दिली.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.