गुरुवार, १४ मे, २०२०

‘भारत माता की जय!’ जय घोषात 1 हजार 456 मजूर उत्तरप्रदेशकडे रवाना



  


          कोल्हापूर, दि. 14 (जिल्हा माहिती कार्यालय) : ‘भारत माता की जय!’ अशा घोषणा देत लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेले उत्तरप्रदेशमधील 1 हजार 456 मजूर आज सायंकाळी श्रमिक विशेष रेल्वेने उत्तरप्रदेशकडे रवाना झाले.
            आजरा, भुदरगड, चंदगड, गडहिंग्लज, हातकणंगले, राधानगरी, शाहूवाडी आणि शिरोळ या तालुक्यातील 1 हजार 456 मजुरांचा यामध्ये समावेश आहे. या सर्वांना 2 दिवसांच्या जेवणाची तसेच नाश्ता आणि पाणी याचे किट वाटप करण्यात आले.  यावेळी हातकणंगल्याचे तहसिलदार प्रदिप उबाळे, सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.
0 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.