कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय) : मागील वर्षी जिल्ह्यामधील पूर
परिस्थिती लक्षात घेऊन येत्या पावसाळ्यासाठी एनडीआरएफच्या दोन तुकडया उपलब्ध व्हाव्यात, अशी
मागणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पूनर्वसन महसूल
आणि वन विभाग सचिवांकडे केली आहे.
गेल्यावर्षीच्या महापुराचा अनुभव लक्षात घेऊन
यंदाच्या पावसाळ्यात दक्षता म्हणून 15 जून 2020 ते 31 ऑगस्ट 2020 या कालावधीसाठी एनडीआरएफच्या
दोन तुकड्यांची जिल्हयात मागणी करण्यात आली आहे. या दोन्ही तुकडयामध्ये प्रत्येकी
25 जवान 5 बोटीसह उपलब्ध करुन देण्याची मागणी पत्रात करण्यात आली आहे. यातील
एक तुकडी कोल्हापूर शहरासाठी तर दुसरी तुकडी शिरोळसाठी उपलब्ध करुन देण्याचे नियोजित
आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.