कोल्हापूर, दि. 20 (जिल्हा माहिती अधिकारी) -
आजअखेर एकूण 19 रेल्वेमधून 25 हजार 521 मजूर जिल्ह्यामधून मध्यप्रदेश,
राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडकडे रवाना झाले आहेत.
आज दुपारी १ वा जिल्ह्यातील 1224 मजुरांना घेवून
बिहारमधील आरारियाकडे रेल्वे
रवाना झाले. लोकमतचे संपादक वसंत भोसले, आयएसटीई नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ.
प्रतापसिंह देसाई यांनी हिरवा झेंडा दाखवला. सायंकाळी 5 वाजता जिल्ह्यातील
1509 मजुरांना घेवून बिहारमधील बरोनीकडे रेल्वे रवाना झाली. खासगी प्राथमिक शिक्षक
सेवक समितीचे राज्यध्यक्ष भरत रसाळे आणि एस.एच.पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवला.
यावेळी डॉ. महादेव नरके, डी.डी.पाटील,
प्रा. राजेंद्र रायकर, हेमंत उलपे, पार्थ मुंडे, दिपक थोरात, शामराव कदम आदी
उपस्थित होते.
आजअखेर जिल्ह्यातील एकूण 25
हजार 521 रवाना झालेल्या मजुरांपैकी सर्वाधिक १३ हजार ५५२ उत्तरप्रदेशकडे रवाना
झाले आहेत. बिहारकडे 8 हजार 421, मध्यप्रदेशकडे १०६६, झारखंडकडे १४६० आणि
राजस्थानकडे १४७७ मजूर परतले आहेत.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.