मंगळवार, २६ मे, २०२०

अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा प्रशिक्षणार्थ्यांनी ऑनलाईन परिक्षा फॉर्म भरावा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे आवाहन



कोल्हापूर,दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय): कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिकाऊ उमेदवारांच्या 110 व्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून प्रशिक्षणार्थ्यांनी ऑनलाईन परिक्षा फॉर्म भरावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर यांनी केले आहे.
राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे शिकाऊ उमेदवारी अधिनियम 1961 अंतर्गत शिकाऊ उमेदवारांच्या 110 व्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, मात्र ज्या उमेदवाराचे प्रशिक्षण 15 एप्रिल 2020 पर्यंत पूर्ण झाले आहे, त्या  सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा फॉर्म भरावा व त्याची एक प्रत व परीक्षा फी आयटीआय येथे बीटीआरआय विभागात लॉकडाऊननंतर जमा करावी, असे आवाहनही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने केले आहे.
000000





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.