कोल्हापूर,
दि. 14 (जि.मा.का) :- लॉकडाऊन कालावधीत अनुज्ञप्तीधारकांनी मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन
केल्यामुळे जिल्हयातील दोन मद्यविक्री अनुज्ञप्ती निलंबित तर एका अनुज्ञप्तीवर
गुन्हा नोंद करण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील
यांनी दिली.
संपूर्ण
जगात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असून देशातही कोरोना विषाणूमुळे
बाधित लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, या पार्श्वभूमीवर सध्या भारत सरकारने
लॉकडाऊनचे आदेश पारित केले आहेत. अशा गंभीर परिस्थितीमध्ये लोकांमध्ये संसर्ग वाढू
नये, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मद्यविक्री अनुज्ञप्त्या लॉकडाऊनमध्ये
बंद होत्या.
पांडुरंग गणपती वंडकर, हॉटेल दावण एफएल-3 क्र. 909 मुरगूड,
ता. कागल या अनुज्ञप्तीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक, मुरगुड पोलीस ठाणे यांनी
संचारबंदी अंमलात असताना संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करुन मद्यविक्री करित असल्याचे
निदर्शनास आल्याने कार्यवाही केली असून त्याअनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागास
केलेल्या अहवालास अनुसरुन अनुज्ञप्तीवर विभागीय विसंगती गुन्हा नोंद करण्यात आला
आहे.
कुमुदिनी बाळासाहेब सोनवणे, मे. सुशिल वाईन्स, एफएल-2 क्र.
52 व सीएलएफएलटिओडी-3 क्र. 60, भाऊसिंगजी रोड, कोल्हापूर या अनुज्ञप्तीवर पोलीस
निरीक्षक लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे यांच्या अहवालाच्या अनुषंगाने विभागीय विसंगती
गुन्हा नोंद करुन आयुक्त राज्य उत्पादन शुल्क यांनी अनुज्ञप्ती सुरु करण्याकरिता
विहीत केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा भंग केल्यामुळे जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी
या अनुज्ञप्ती पुढील आदेश होईपर्यंत निलंबित केल्या आहेत.
सुशिला सुभाष अग्रवाल, हॉटेल सारथी, एफएफ-3 क्र. 101
इचलकरंजी ता. हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर या अनुज्ञप्तीवर शिवजयंती उत्सव दिनांक
19 फेब्रुवारी रोजी ड्राय डे (कोरडा दिवस) असताना मद्यविक्री केल्याबाबत विभागीय
विसंगती प्रकरण नोंद करण्यात आले होते. या अनुज्ञप्ती देखील पुढील आदेश होईपर्यंत
निलंबित करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील अबकारी अनुज्ञप्तीधारकाकडून अनुज्ञप्तीच्या
नियम, अटी व शर्तींचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर राज्य उत्पादन
शुल्क विभागाकडून कडक कारवाई करण्यात येईल, असेही अधीक्षक श्री. पाटील यांनी
स्पष्ट केले.
0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.