शुक्रवार, २२ मे, २०२०

आजअखेर 29 हजार 706 मजूर कोल्हापुरातून रवाना आज उत्तरप्रदेशकडे 1 हजार 447 तर बिहारकडे 882 मजूर रवाना



 
            कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय) : आजअखेर एकूण 22 रेल्वेमधून 29 हजार 706 मजूर जिल्ह्यामधून मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडकडे रवाना झाले आहेत.
             ‘भारत माता की जय!’ अशा घोषणा देत लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेले उत्तरप्रदेशमधील इटावाकडे आज दुपारी 1 वाजता 1 हजार 447 मजूर तर 882 मजूर सायंकाळी 6 वाजता श्रमिक विशेष रेल्वेने बिहारकडे रवाना झाले.
            उत्तरप्रदेशमधील इटावाकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये हातकणंगलेमधील 430, करवीरमधील 70, इचलकरंजीमधील 400, आजरामधील 60, कागलमधील 60, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील 400 व इतर भागातील 27 असे एकूण 1 हजार 447 मजुरांचा यामध्ये समावेश आहे.
            बिहारकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये गडहिंग्लजमधील 11, हातकणंगलेमधील 351, इस्लापूरमधील (सांगली) 61, इचलकरंजीमधील 233, कागलमधील 43, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील 43 व करवीरमधील 140 असे एकूण 882 मजुरांचा यामध्ये समावेश आहे.
                       
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.