रविवार, २४ मे, २०२०

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेले राज्यातील व परराज्यातील 53 हजार 224 जण रवाना -जिल्हाधिकारी दौलत देसाई


कोल्हापूर, दि. 24 (जिल्हा माहिती कार्यालय) : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेले परराज्यातील 39 हजार 577 तर महाराष्ट्रातील 13 हजार 647 असे 53 हजार 224 जण  आजअखेर त्यांच्या-त्यांच्या गावांना रवाना झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
            लॉकडाऊनमुळे जिल्ह्यामध्ये परराज्यातील सुमारे 39 हजार 577 स्थलांतरित कामगार, विद्यार्थी, पर्यटक, यात्रेकरु, प्रवासी आणि इतर नागरिक अडकले होते. यामध्ये उत्तरप्रदेशमधील 15222, बिहारमधील 11004, मध्यप्रदेशमधील 2590, झारखंडमधील 2131, छत्तीसगडमधील 42, राजस्थानमधील 2940, गुजरातमधील 135, गोवामधील 337, कर्नाटकमधील 3394, आंध्रप्रदेशमधील 46, तेलंगनामधील 68,  केरळमधील 36, तामिळनाडूमधील 335, ओरीसामधील 706, पश्चिम बंगालमधील 218, दिल्लीमधील 9, पूर्वेकडील राज्य 193, आणि इतर 171 असे  39 हजार 577 जण रवाना झाले आहेत. 
            महाराष्ट्रातील अन्य जिल्हयातील 13 हजार 647 जण लॉकडाऊनमुळे कोल्हापूर जिल्ह्यात अडकले होते, यामध्ये मुंबई शहर 101, मुंबई उपनगर 16, ठाणेमधील 520, पालघरमधील 72, रायगडमधील 149, रत्नागिरीमधील 510, सिंधुदुर्गमधील 601, सातारामधील 675, सांगलीमधील 1785, सोलापूरमधील 2245, पुण्यामधील 2245, नाशिकमधील 201, धुळे 180, जळगावमधील 157, नंदुरबारमधील 123, अहमदनगरमधील 1030, औरंगाबादमधील 102, बीड 229, जालनामधील 44, उस्मानाबादमधील 632,  लातुरमधील 889, नांदेडमधील 258, परभणीमधील 185, हिंगोली 49, आमरावती 36,  अकोलामधील 58, बुलढाणामधील 66, यवतमाळमधील 156,  वाशिम 80, नागपूरमधील 57, भंडारा 15, वर्धा 12, गडचिरोली 13, चंद्रपूरमधील 52 आणि गोंदियामधील 104 असे एकूण  13 हजार 647 जण रवाना झाले आहेत.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.