कोल्हापूर, दि. १९ (जिल्हा माहिती अधिकारी) - आजअखेर एकूण १७
रेल्वेमधून २२ हजार ७८८ मजूर जिल्ह्यामधून मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश,
बिहार आणि झारखंडकडे रवाना झाले आहेत. आज दुपारी १ वा जिल्ह्यातील १४५६ मजुरांना
घेवून बिहारमधील मोतिहारीकडे रेल्वे रवाना झाली. मार्केट कमिटी अध्यक्ष दशरथ
माने, सचिव मोहन सालपे, संचालक मंडळ उपस्थित होते. तर सायंकाळी ५ वा १४६० मजुरांना
घेवून झारखंडमधील बोकारोकडे रेल्वे रवाना झाली.
नायब तहसीलदार विपीन लोकरे यांनी हिरवा झेंडा
दाखविला. यावेळी डॉ. महादेव नरके, एस.एच.पाटील उपस्थित होते.
आजअखेर जिल्ह्यातील एकूण २२ हजार ७८८ रवाना
झालेल्या मजुरांपैकी सर्वाधिक १३हजार ५५२ उत्तरप्रदेशकडे रवाना झाले आहेत.
बिहारकडे ५ हजार ६८८, मध्यप्रदेशकडे १०६६, झारखंडकडे १४६० आणि राजस्थानकडे १४७७
मजूर परतले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.