गुरुवार, २१ मे, २०२०

पंतप्रधान पीक विमा योजनेत उसाचा समावेश करावा शेतकऱ्यांचा सहभाग हा ऐच्छिक असावा पालकमंत्री सतेज पाटील यांची मागणी




कोल्हापूर, दि. २१( जिल्हा माहिती कार्यालय)- पंतप्रधान पीक विमा योजनेत ऊस या पिकाचा समावेश करावा. मात्र, या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी ऐच्छिक विषय असावा, अशी मागणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज मुख्यमंत्र्यांकडे केली.
  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व बैठक व्हीडीओ कॉन्फरंसिंगद्वारे आज घेतली. या बैठकीत विविध विषयांचा आढावा त्यांनी घेतला. पालकमंत्री श्री पाटील यावेळी म्हणाले, ऊस तोड यंत्राचा कृषी यांत्रिकीकरण योजनेत अनुदानासाठी समावेश करावा. शेतकऱ्यांना युरिया खताचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी संबंधित कंपन्यांना आदेश द्यावेत अशी मागणीही पालकमंत्र्यांनी यावेळी केली.
पंतप्रधान पीक विमा योजनेत ऊस या पिकाचा समावेश करुन, त्यामध्ये सहभाग होण्यासाठी शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक विषय ठेवावा, अशी प्रमुख मागणीही पालकमंत्री श्री. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. 

   जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या व्हीसीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे उपस्थित होते.
0 0 0 0  0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.