कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय)
: ‘भारत माता की जय!’ अशा घोषणा देत लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेले बिहारमधील 1
हजार 456 मजूर आज सायंकाळी 7 वाजता श्रमिक विशेष रेल्वेने बिहारकडे रवाना झाले.
चेंबर
ऑफ कॉमर्सचे संचालक विज्ञान मुंडे, गोशिमाचे संचालक नितीन दलवाई, स्मॅकचे चेअरमन
गोरख माळी यांनी यावेळी हिरवा झेंडा दाखविला. यानंतर, श्रमिक विशेष रेल्वे बिहारमधील
बिहारशरीफकडे रवाना झाली. यावेळी ज्येष्ठ
उद्योजक रमण राठोड, प्राचार्य डॉ. महादेव नरके आदी उपस्थित होते. या सर्व मजुरांना
2 दिवसांचे जेवण, सुकेअन्नपदार्थ, पाणी आदीचे किट पालकमंत्री सतेज पाटील यांच्या
माध्यमातून देण्यात आले.
आजरा 247, भुदरगड 57,
चंदगड 61, गडहिंग्लज 120, गगनबावडा 28, कागल 54, कोल्हापूर शहर 59, पन्हाळा110,
राधानगरी 18, शाहूवाडी 25 आणि शिरोळ 677 असे एकूण 1 हजार 456 मजुरांचा यामध्ये
समावेश आहे. सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता संजय
पाटील आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.