गुरुवार, २१ मे, २०२०

ज्याबाहेर जाणाऱ्या व राज्याबाहेरुन येणाऱ्या 55 हजार 663 व्यक्ती -जिल्हाधिकारी दौलत देसाई


रा
         कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय) : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या राज्याबाहेर जाणाऱ्या आणि राज्याबाहेरुन जिल्हयात येणाऱ्या 55 हजार 663 व्यक्ती  तर महाराष्ट्र राज्यातील अन्य जिल्हयामध्ये जाणाऱ्या आणि महाराष्ट्रातील अन्य जिल्हयामधून येणाऱ्या 23 हजार 935 व्यक्ती असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
जिल्हयातून राज्याबाहेर जाणाऱ्या आणि राज्याबाहेरुन जिल्हयात येणाऱ्या 55 हजार 663 व्यक्तींमध्ये राज्याबाहेर जाणाऱ्या 54 हजार 364 तर राज्याबाहेरुन जिल्ह्यात येणाऱ्या 1 हजार 299 व्यक्तींचा समावेश आहे.  तसेच महाराष्ट्र राज्यातील अन्य जिल्ह्यामध्ये जाणाऱ्या आणि महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यामधून येणाऱ्या 23 हजार 935 व्यक्तींमध्ये महाराष्ट्र राज्यातील अन्य जिल्ह्यामध्ये जाणाऱ्या 16 हजार 241 तर महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यामधून येणाऱ्या 7 हजार 694 व्यक्तींचा समावेश असल्याचेही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.
0 0 0 0  0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.