कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय) : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील 364 प्रवाशांना 16 एसटी बसमधून त्या-त्या राज्याच्या सीमांपर्यंत सोडण्यात आले. जिल्हयातील सर्व आगार ते कोल्हापूर रेल्वे स्थानकापर्यंत 207 एसटी बसमधून 5025 प्रवाशांना सोडण्यात आल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यामध्ये परराज्यातील अडकलेल्या स्थलांतरित कामगार, विद्यार्थी, पर्यटक, यात्रेकरु, प्रवासी आणि इतर नागरिकांना त्यांच्या-त्यांच्या राज्याच्या सीमापर्यंत एसटीबसमधून सोडण्याची व्यवस्था शासनाच्या निर्देशानुसार करण्यात आली असून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 16 एसटी बसमधून 364 प्रवाशांना त्या-त्या राज्याच्या सीमापर्यंत सोडण्यात आले, यामध्ये कर्नाटक सीमेपर्यंत 116 प्रवाशांना तर मध्यप्रदेश सीमेपर्यंत 248 प्रवाशांना सोडण्यात आले.
तसेच शासनाने परराज्यातील मजुरांसाठी सुरु केलेल्या श्रमिक विशेष रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशासाठी जिल्हयातील सर्व आगार ते कोल्हापूर रेल्वे स्थानकापर्यंत 207 एसटी बसमधून 5025 प्रवाशांना सोडण्यात आले असून यामध्ये कोल्हापूर आगारातून 48 एसटी बसव्दारे 1383 प्रवाशांना, संभाजीनगर आगारातून 38 एसटी बसव्दारे 747 प्रवाशांना, इचलकरंजी आगारातून 81 एसटी बसव्दारे 1989 प्रवाशांना, गडहिंग्जल आगारातून 8 एसटी बसव्दारे 176 प्रवाशांना, गारगोटी आगारातून 5 एसटी बसव्दारे 106 प्रवाशांना,चंदगड आगारातून 3 एसटी बसव्दारे 51 प्रवाशांना, कुरुंदवाड आगारातून 22 एसटी बसव्दारे 535 प्रवाशांना,राधानगरी आगारातून एका एसटी बसव्दारे 19 प्रवाशांना आणि आजरा आगारातून एका एसटी बसव्दारे 19 प्रवाशांना कोल्हापूर रेल्वे स्थानकापर्यंत सोडविण्यात आल्याचेही पालकमंत्री म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.