सोमवार, १८ मे, २०२०

आजअखेर 18272 मजूर कोल्हापुरातून रवाना सर्वाधिक 11 हजार 952 उत्तर प्रदेशमधील



कोल्हापूर, दि. 18 (जिल्हा माहिती अधिकारी)- आजअखेर  एकूण 14 रेल्वेमधून 18 हजार 272 मजूर जिल्ह्यामधून मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारकडे रवाना झाले आहेत.
            आज सायंकाळी 6 वा जिल्ह्यातील 1060 मजुरांना घेवून उत्त्त्तर प्रदेशमधील बलियाकडे  रेल्वे रवाना झाली. सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव, करविरच्या सभापती अश्विनी धोत्रे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रेल्वे मार्गस्थ करण्यात आली. यावेळी शोभा राजमाने, प्रदिप झांबरे, सागर पाटील, कृष्णा धोत्रे, सुनील राजमाने, डॉ. महादेव नरके, विनायक सुर्यवंशी, प्रविण पाटील आदी उपस्थित होते.
            आजअखेर जिल्ह्यातील एकूण 18 हजार 272 रवाना झालेल्या मजुरांपैकी सर्वाधिक 10 हजार 952 उत्तरप्रदेशकडे रवाना झाले आहेत. बिहारकडे 4 हजार 232, मध्यप्रदेशकडे 1066 आणि राजस्थानकडे 1477 मजूर परतले आहेत.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.