रविवार, १७ मे, २०२०

आजअखेर १७६६७ मजूर कोल्हापुरातून रवाना सर्वाधिक १० हजार ८९२ उत्तर प्रदेशमधील


कोल्हापूर, दि. १७(जिल्हा माहिती अधिकारी)- आजअखेर  एकूण १३ रेल्वेमधून १७ हजार ६६७ मजूर जिल्ह्यामधून मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारकडे रवाना झाले आहेत.
            आज दुपारी १ वा जिल्ह्यातील १४५६ मजुरांना घेवून बिहारमधील मोतीहारीकडे रेल्वे रवाना झाली. आपत्ती व्यवस्थापन समितीचे स्वयंसेवक शुभांगी घराळे, कृष्णात सोरटे, सुनील कांबळे, स्वाती सपकाळे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रेल्वे मार्गस्थ करण्यात आली.
            तर सायंकाळी ६ वा १३४८ मजुरांना घेवून उत्तर प्रदेशमधील बलियाकडे रवाना झाली. उपमहापौर संजय मोहिते, रेल्वे बोर्ड सदस्य श्री.बियाणी यांनी झेंडा दाखवला. यावेळी डॉ.महादेव नरके,तानाजी लांडगे, एस.एच.पाटील, प्रवीण पाटील,सचिन कदम, प्रणव चव्हाण, आदित्य कांबळे, आनंदा करपे उपस्थित होते
            आजअखेर जिल्ह्यातील एकूण १७ हजार६६७ रवाना झालेल्या मजुरांपैकी सर्वाधिक १०हजार ८९२ उत्तरप्रदेशकडे रवाना झाले आहेत. बिहारकडे ४ हजार २३२, मध्यप्रदेशकडे १०६६ आणि राजस्थानकडे १४७७ मजूर परतले आहेत.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.