कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा
माहिती कार्यालय) : आजअखेर एकूण
23 रेल्वेमधून 30 हजार 849 मजूर जिल्ह्यामधून मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश,
बिहार, झारखंड व ओडीसाकडे रवाना झाले आहेत.
‘भारत माता की जय!’ अशा घोषणा देत लॉकडाऊनमुळे
जिल्ह्यात अडकलेले झारखंडमधील बोकारो व ओडीसाकडे आज दुपारी 1 वाजता 1 हजार 143
मजूर श्रमिक विशेष रेल्वेने रवाना झाले.
झारखंडमधील
बोकारो व ओडीसाकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये करवीरमधील 256, कागलमधील 44, गगनबावडामधील
6, शिरोळमधील 21, हातकणंगलेमधील 330, गडहिंग्लजमधील
8, चंदगडमधील 113, इचलकरंजीमधील 193,
पन्हाळामधील 45, शाहूवाडीमधील 6, भुदरगडमधील 7, राधानगरीमधील 6 व कोल्हापूर महानगरपालिका
क्षेत्रातील 108 असे एकूण 1 हजार 143
मजुरांचा यामध्ये समावेश आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.