कोल्हापूर,दि.
21 (जिल्हा माहिती कार्यालय): काल दिनांक
20 मे रोजी रात्री 8.30 पर्यत 1295 आणि आज सकाळी 10 वाजेपर्यंत 343 असे एकूण 1638
अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी आहे.
जिल्ह्यातील
सीपीआर, आयजीएम, डॉ. डी. वाय. पाटील, आयसोलेशन हॉस्पीटल या प्रमुख हॉस्पीटलसह
गडहिंग्लज, चंदगड, आजरा, राधानगरी, हातकणंगले, कागल, भूदरगड, गगनबावडा, पन्हाळा,
शाहूवाडी, शिरोळ, अतिग्रे येथील संजय गोडावत हॉस्टेल, अॅपल हॉस्पीटल आणि आधार
हॉस्पीटल या एकूण 18 ठिकाणी स्वॅब कलेक्शन करण्यात येते.
काल रात्री 8.30 पर्यंत
प्राप्त झालेल्या 1338 अहवालांपैकी 1295 तर आज सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त
झालेल्या 346 अहवालांपैकी 343 अहवाल
निगेटिव्ह आले आहेत. ही दिलासा देणारी बाब
आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.