कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये
करण्यात आलेली शिथिलता तसेच पावसाळयात उदभवणारे साथीचे आजार या पार्श्वभूमीवर
संभाव्य उद्भवणारी रक्तटंचाई दुर करण्यासाठी
रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कार्यक्रम
अधिकारी दीपा शिपुरकर यांनी केले आहे.
कोरोनाच्या
पार्श्वभूमीवर जिल्हयात संचारबंदी लागू केली आहे, परंतु राज्य रक्त संक्रमण परिषद व आरोग्य
मंत्रालयाच्या मार्गदर्शक प्रणालीचा अवलंब करुन (सुरक्षित सामाजिक अंतर, मास्क चा
वापर,sanitizer ने करावयाची स्वच्छता , एका वेळी पाच जणापेक्षा जास्त रक्तदाते
एकत्र न बोलावणे तसेच रक्त देणारया व्यक्ती चा इतिहास याची माहिती घेऊन ) रक्तदान
शिबिरे घेण्यासाठी तरुण मंडळे, सेवाभावी संस्था यानी पुढाकार घ्यावा, तसेच ज्या
दात्यांना रक्तदान नोंदणी करावयाचे आहे. त्यांनी http://www.kolhapurcollector.com/blooddonation/ या संकेतस्थळावर आपल्या नावाची नोंदणी करावी,
नोंदणी करण्यात येणाऱ्या दात्यांना आवश्यकतेनुसार रक्तपेढ्या आणि जिल्हा प्रशासन
यांच्या समन्वयाने रक्तदानासाठी बोलविण्यात येईल, असेही दीपा शिपुरकर म्हणाल्या.
सद्यस्थितीत
लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्याने नियोजित शस्त्रक्रिया व रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात मोठ्या प्रमाणत रूग्ण दाखल होत
आहेत. बहुतांशी हॉस्पिटलमध्ये उपचार व शस्त्रक्रिया सुरु झाल्या आहेत.
ह्रदयशस्त्रक्रिया ,कँन्सर ,बाळंतपण, डायलेसीस तसेच नियोजित शस्त्रक्रिया
,थॉलेसमिया व ऑनिमिया या आजारामध्ये उपचारावेळी रक्त व रक्तघटकाची गरज भासत असते.
याबरोबरच लॉकडाऊन परिस्थितीत अपघाताचे तसेच कोरोनाच्या भितीमुळे हॉस्पिटल मध्ये admit होण्याचे कमी प्रमाण व
हॉस्पिटलकडूनही दक्षता म्हणून नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याने गेल्या
दोन महिन्यात उपचाराअभावी रक्ताची मागणी कमी होती .परंतु
पुणे - मुंबई सारख्या शहरात रेड झोन परिस्थितीमुळे रुग्णाना उपचारात रक्तपुरवठा व्हावा म्हणून शासनाने रक्तदात्यांना रक्तदान
करण्याचे आवाहन केले. शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात
महाराष्ट्रभर रक्तसंकलन झाले. पण रक्त हे ४२ दिवसच टिकून रहात असलेने व आता लॉकडाऊन शिथिल केलेने दोन महीन्याच्या
प्रतिक्षेनंतर रुग्ण मोठ्या संख्येने दाखल होत असलेने त्याना उपचारावेळी रक्ताची गरज भासत
आहे . तसेच आता सुरु होणा-या मान्सुनपुर्व वातावरणामुळे साथीच्या आजारामध्ये रक्त
घटकांच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे .पर्यायी,
सद्यस्थितीत जिल्ह्यातील रक्तपेढींमध्ये रक्तसाठा मागणीच्या मानाने कमी असल्याने
रक्तदात्यांनी या पार्श्वभूमीवर संभाव्य उद्भवणारी रक्तटंचाई दूर करण्यासाठी पुढे येणे गरजेचं आहे.
तरी ज्या दात्यांना
रक्तदान नोंदणी करायची इच्छा आहे त्यांनी http://www.kolhapurcollector.com/blooddonation/ या संकेतस्थळावर अधिकाधिक नोंदणी करावी, असेही
आवाहनही दीपा शिपुरकर यांनी केले आहे.
000000 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.