कोल्हापूर,
दि. 19 (जिल्हा
माहिती कार्यालय) : हॅन्डीकॅप
बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित हॅन्डीकॅप व्यवसाय प्रशिक्षण व
रोजगार उद्योग केंद्र कोल्हापूर यांच्या शासनमान्य कार्यशाळेत दिव्यांगासाठी
व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रम शिकविले जातात. या कार्यशाळेत शिवणकाम, कॉप्युटर
कोर्स, मराठी व इंग्रजी टंकलेखन, बागकाम इ. अभ्यासक्रम मोफत शिकविले जातात. दिव्यांग
मुलांना प्रवेश घेण्याचे वय 18 ते 25 असून जे प्रशिक्षणार्थीय बाहेर गावचे आहेत
त्यांच्यासाठी जेवण व राहणेची उत्तम व मोफत सोय संस्थेमार्फत करणेत आली आहे.
कोव्हिड 19 या
आजाराच्या प्रतिबंधात्मक सुरक्षिततेसाठी प्रशिक्षणार्थीसाठी ऑनलाईन https://forms.gle/c7ruFnjE2VfAxhNc9
या संकेतस्थळावर प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक
माहितीसाठी रूबीन लोखंडे 8857896445 किंवा राहूल इनामदार 9860034414 किंवा
दूरध्वनी क्र. 0231-2639991 या क्रमांकावर संपर्क साधावा. जास्तीत जास्त दिव्यांग
बांधवांनी सदर प्रवेश घेवून याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक रूबीन
लोखंडे यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.