कोल्हापूर, दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील 4 निवारागृहांमध्ये राज्यातील 15 आणि
परराज्यातील 15 अशा एकूण 30 जणांची सोय करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत
देसाई यांनी दिली.
कोल्हापूर महानगरपालिका
क्षेत्रात शेठ रुईया विद्यालय, मंगळवार पेठ येथे राज्यातील 1 एकूण 1 जण समावेश असून याची क्षमता 50 जणांची
आहे. करवीर - सरस्वती मंगल
कार्यालय उजळाईवाडी
येथे परराज्यातील 5 एकूण 5 जण असून क्षमता 70 जणांची आहे. डी. फार्मसी कॉलेज
उजळाईवाडी येथे राज्यातील 2 परराज्यातील 10 असे एकूण 12 असून याची एकूण क्षमता 50
जणांची आहे. शिरोळ- शाळा क्रमांक 1
जयसिंगपूर येथे राज्यातील 12 असे एकूण 12 क्षमता 50 आहे.
यामध्ये
कर्नाटकातील 1, तामिळनाडूमधील 11, केरळमधील 3, अशा एकूण 3 राज्यातील 15 जणांचा
तसेच महाराष्ट्रातील 15 असे मिळून 30 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले
आहे.
जिल्ह्यात 1 कम्युनिटी किचनच्या माध्यमातून 5 जणांची सोय
जिल्ह्यातील
स्थलांतरीत अडकलेल्या कामगार, मजुरांसाठी 1 ठिकाणी कम्युनिटी किचन सुरू करण्यात
आले आहे. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, सायंकाळी चहा, बिस्कीट आणि रात्रीचे जेवण
अशी सुविधा या मजुरांसाठी देण्यात आली आहे. याचा लाभ 5 जण घेत आहेत.
करवीर
तालुका- सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.