कोल्हापूर,दि.
26 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी
जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार क्रिडा संकुले, मैदाने आणि इतर सार्वजनिक
मोकळ्या जागा केवळ वैयक्तिक व्यायामासाठीच सामाजिक अंतराचे निकष पाळून खुल्या
राहतील. मात्र सामुहिक क्रिडाप्रकारासाठी वापर होता कामा नये, असा इशारा जिल्हादंडाधिकारी
दौलत देसाई यांनी दिला आहे.
जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी
प्रतिबंधात्मक आदेश पारित करण्यात आला आहे. या आदेशामधील नॉन रेड झोनमध्ये क्रीडा
संकुले, मैदाने आणि इतर सार्वजनिक मोकळ्या जागा या वैयक्तिक व्यायामासाठी खुल्या
राहतील. परंतु प्रेक्षक आणि सामुहिक क्रिडा प्रकार, व्यायामप्रकार यांना परवानगी
असणार नाही. सर्व शारिरीक व्यायाम आणि इतर व्यायाम प्रकार सामाजिक अंतराचे निकष
पाळून परवानगी देण्यात आलेली होती. तथापि नागरिक खुल्या मैदानावर, इतर मोकळ्या
जागांवर व इनडोअर स्टेडीयममध्ये सामुहिक क्रिडा प्रकार जसे की, क्रिकेट, फुटबॉल, टेनिस,
बॅडमिंटन इ. तसेच काही नागरिक व्यायाम शाळेत व्यायाम प्रकार करत आहेत. त्यामुळे क्रिडा
साहित्याची एकमेकांत देवाण-घेवाण होते. परंतु प्रत्येक वेळी असे साहित्य सॅनिटाइझ करणे
शक्य नसल्यामुळे असा सामुहिक वापर थांबविणे आवश्यक आहे.
तरी जिल्हयातील क्रिडा संकुले, मैदाने तसेच सार्वजनिक
मोकळ्या जागांमध्ये सामुहिक क्रिडाप्रकारासाठी वापर होता कामा नये, या बाबींचे उल्लंघन
करणाऱ्या व्यक्ती व त्यास सहाय्य करणाऱ्या सर्व संबंधित व्यक्तींवर अथवा संस्थेवर
भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण
कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी
दिले आहेत.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.