रविवार, १७ मे, २०२०

वैद्यकीय सेवा, अत्यावश्यक कारणा व्यतिरिक्त प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करा -जिल्हाधिकारी दौलत देसाई





कोल्हापूर, दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात सायंकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत वैद्यकीय सेवा किंवा अत्यावश्यक कारणा व्यतीरिक्त सर्व वाहनांच्या हालचाली पूर्णपणे बंद रहाणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.
       जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी पोलीस अधीक्षक यांना याबाबत आज पत्र पाठविले आहे. शासनाकडील 2 मे रोजीच्या ओदशामध्ये नमुद प्रतिबंधीत, बंद क्षेत्रे, तसेच सशर्त परवानगी असलेली क्षेत्रे घोषित करण्यात आली होती. त्याचप्रमाणे आजपर्यंत जिल्हा बंदी व संचारबंदी आदेशही लागू करण्यात आले होते. या आदेशाची मुदत 31 मे रोजी रात्री 12 पर्यंत वाढविण्यात आलेली असून प्रतिबंधित, बंद क्षेत्रे तसेच सशर्त परवानगी असलेली क्षेत्रे कायम ठेवण्यात आलेली आहेत.
          केंद्र शासनाने आज दिलेल्या निर्देशाप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यात सायंकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत वैद्यकीय सेवा किंवा अत्यावश्यक कारणा व्यतिरिक्त सर्व नागरिकांच्या व वाहनांच्या हालचाली पूर्णपणे बंद रहाणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे ओदशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.
          वरील बाबींचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व त्यास सहाय करणाऱ्या सर्व संबंधित व्यक्तींवर अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई करण्यात यावी, असे यात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.