कोल्हापूर, दि. 15(जिल्हा माहिती कार्यालय)
: जयसिंगपूरमधील कलावती
मंदीरशेजारी, संभाजीनगर, नांदणी रोड या भागात कोरोना संसर्गित रूग्ण सापडल्याने
त्याच्या राहत्या निवासस्थानापासून 300 मीटर अंतरापर्यंतच्या चारही बाजूस
रस्त्यांच्या सीमा सीलबंद करून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे आदेश
इचलकरंजीचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ. विकास खरात यांनी काल
दिले.
या
आदेशात म्हटले आहे, सद्यस्थितीत कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भाव
पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोराना विषाणूचे
संसर्ग रोखण्याकरिता त्यावर प्रतिबंधात्मक उपाय-योजना आखणे आवश्यक आहे. कोरोना
विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता या विषाणूची लागण एक संक्रमित रूग्णाकडून अन्य
व्यक्तीस, इसमास त्यांच्या संपर्कात आल्याने होते. तसेच शिरोळ तालुक्यातील
कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 1 झाली आहे. हा रुग्ण कलावती मंदिर शेजारी,
संभाजीनगर, नांदणी रोड या भागातील आहे. या ठिकाणी त्यांच्या राहता
निवासस्थानापासून 300 मीटर अंतरापर्यंतच्या चारही बाजू सीमा सिलबंद करणे आवश्यक
आहे.
भारतीय
साथ रोग नियंत्रण अधिनियम - 1897 व जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडील दिशा
निर्देशानुसार जयसिंपूर येथील कलावती मंदिर शेजारी, संभाजीनगर, नांदणी रोड या
भागातील क्षेत्र उपविभागीय दंडाधिकारी इचलकरंजी विभाग इचलकरंजी या आदेशाने
प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात येत आहे व या क्षेत्राच्या चारही बाजूस
सर्व रस्त्यांच्या सीमा सिलबंद करण्यात येत आहेत.
या
प्रतिबंधित क्षेत्रामध्ये जयसिंगपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी खालीलप्रमाणे
काटेकोरपणे पूर्तता करावी.
या
प्रतिबंधित क्षेत्रामधील सर्व 100 टक्के रहिवाशांचे मोबाईल आरोग्य सेतू ॲप
कार्यान्वित करून घेण्यात यावे. बाधित रूग्णांच्या संपर्कातील सर्व रहिवाश्यांची
यादी सविस्तरपणे तयार करावी. बाधित रूग्णांच्या संपर्कातील रहिवाशांचे होम आणि
संस्थात्मक क्वॉरंटाईन बाबत वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती त्वरित निर्णय
घेवून कार्यवाही करावी. या प्रतिबंधित क्षेत्रामधील संपूर्ण घरांचे विशेष
पथकामार्फत सर्वेक्षण करून घेण्यात यावे. बाधित रूग्णांचे संपर्कातील रहिवाशांच्या
वैद्यकीय अधिकारी यांच्या तपासणी अंती विहीत केलेल्या निर्देशानुसार व्यवस्थापन
करण्यात यावे. प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाश्यांचे संपर्क माध्यमाव्दारे
परिणामकारक समुपदेशन व प्रशिक्षण देण्यासाठी प्रबळ उपाययोजनांचा अवलंब करण्यात
यावा. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये प्रवेशास व बाहेर जाण्यास पूर्णत: प्रतिबंध
करण्यात यावा. तथापि, आवश्यक सेवेसाठी आत-बाहेर येणाऱ्या रहिवाशांसाठी
नगरपालिकामार्फत स्वतंत्र कर्मचारी नेमण्यात येवून नोंद वहित तपशिलवार नोंदी
ठेवण्यात याव्यात. पोलीस प्रशासन तसेच जयसिंगपूर नगरपरिषद यांनी प्रतिबंधित
क्षेत्रामध्ये बॅरेकेटिंग केलेल्या क्षेत्रामध्ये कडक बंदोबस्त व नियंत्रण
ठेवण्यात यावे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.