शनिवार, २ मे, २०२०

जिल्ह्यात येण्यासाठी १२ हजार १४७ जणांची तर बाहेर जाण्यासाठी ८ हजार ९४० जणांची https://bit.ly/Kopentryexit लिंकवर नोंदणी -जिल्हाधिकारी दौलत देसाई



कोल्हापूर, दि. २ (जि.मा.का) :  कोल्हापुरात प्रवेश करण्यासाठी १२ हजार १४७ जणांनी तर जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या ८ हजार ९४० जणांनी  प्रशासनाने तयार केलेल्या https://bit.ly/Kopentryexit या लिंकवर आपली माहिती भरली. आज सायंकाळी ७ वाजेपर्यंत एकूण २१ हजर ११८ जणांनी नोंदणी केल्याची माहिती, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली.
        लॉकडाऊनमुळे जिल्ह्यामध्ये स्थलांतरित कामगार, विद्यार्थी, पर्यटक, यात्रेकरु, प्रवासी आणि इतर नागरिक अडकले आहेत. अशा व्यक्तींना आपापल्या जिल्ह्यांमध्ये तसेच राज्यामध्ये जाण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केले आहे. या धोरणानुसार कोल्हापूर जिल्ह्यामधून बाहेर जाणाऱ्या तसेच बाहेरच्या जिल्ह्यामधून कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी जिल्हा प्रशासनाने  https://bit.ly/Kopentryexit ही लिंक तयार केली आहे. यावर माहिती भरण्याचे आवाहन काल केले होते.
   आज सायंकाळी ७ वाजेपर्यंत यावर जिल्ह्यात प्रवेशासाठी १२ हजार १४७ जणांनी, जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ८ हजार ९४० जणांनी तर ३१ जणांनी जाणे वा येणे अशी कोणतीच माहिती न देता या लिंकवर नोंदणी केली आहे. 
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.