कोल्हापूर,दि. 16 (जि.मा.का.)
: विधानसभा निवडणुकीनिमित्त तैनात करण्यात आलेल्या स्थिर निरीक्षण पथकामार्फत कोल्हापूर-गगनबावडा
राज्य मार्गावर 15 लाख 16 हजार 462 इतक्या किंमतीचे सोने,चांदी व रोख रक्कम जप्त करण्यात
आली आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नयेत
यासाठी निवडणूक विभागामार्फत जिल्ह्यात स्थिर निरीक्षण पथके कार्यरत करण्यात आली आहेत.
गगनबावडा- कोल्हापूर राज्यमार्गावर कार्यरत असणाऱ्या पथक क्रमांक 5 मधील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी
संशयीत वाहनाची तपासणी करून ही कारवाई केली. यामध्ये 9 लाख 46 हजार 202 रूपये किंमतीचे
सोने, 6 हजार 500 रूपये किंमतीची चांदी आणि 5 लाख 45 हजार 760 रोख रक्कमेचा समावेश
आहे. या कारवाईत पथक प्रमुख गुंडा कांबळे, कर सहाय्यक हर्षल पालखे, पोलिस कॉन्स्टेबल
किरण चव्हाण आणि कॅमेरामन सुरेश जोगडे यांचा सहभाग होता. गगनबावडा-कोल्हापूर राज्यमार्गावर 15 ऑक्टोबर रोजी 3.45 च्या सुमारास
स्विप्ट डिझायर एम एच 01 एम व्ही 4755 या वाहनाची तपासणी करण्यात आली. वाहनात सापडलेल्या
मुद्देमालाबाबत वाहनचालकाकडे तपासणी करण्यात आली असता वाहनचालक याबाबत कोणतेही कागदपत्रे
सादर करू शकले नाहीत. त्यामुळे जप्त मालाचा पंचनामा करून सदरचा मुद्देमाल गगनबावडा
पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आला असल्याचे
स्थिर निरीक्षण पथक प्रमुख श्री. कांबळे यांनी कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.