इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१९

शिरोळ वगळता 9 मतदार संघात 17 उमदेवारांची 20 नामनिर्देशनपत्रे



       कोल्हापूर दि. 1 (जि.मा.का.) : शिरोळ विधानसभा मतदार संघ वगळता आज  उर्वरित 9 विधानसभा मतदार संघात 17 उमदेवारांनी 20 नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. यामध्ये चंदगड, राधानगरी,  कोल्हापूर दक्षिण आणि हातकणंगले विधानसभा मतदार संघात प्रत्येकी 2 उमेदवारांनी तर कागल, कोल्हापूर उत्तर, शाहूवाडी आणि इचलकरंजी विधानसभा मतदार संघात प्रत्येकी 1 आणि करवीर विधानसभा मतदार संघात 5 उमेदवारांनी नामनिर्देशनत्र दाखल केली आहेत.
          चंदगडमध्ये- रमेश दत्तु रेडेकर (अपक्ष), सुनिता रमेश रेडेकर (अपक्ष),  राधानगरीमध्ये- राहूल बजरंग देसाई (अपक्ष), शीतल दत्तात्रय रावत (अपक्ष)  कागलमध्ये-रवींद्र तुकाराम कांबळे (बसपा-1), कोल्हापूर दक्षिणमध्ये- अमल महादेवराव महाडिक ( भारतीय जनता पार्टी यांनी 2) शौमिका अमल महाडिक (भारतीय जनता पार्टी-1) असे तीन नामनिर्देशनपत्र दाखल. करवीरमध्ये-बजरंग कृष्णा पाटील (बहुजन समाज पार्टी), पांडुरंग निवृत्ती पाटील (इंडियन नॅशनल काँग्रेस यानी दोन नामनिर्देशनपत्र), राहूल पांडुरंग पाटील (इंडियन नॅशनल काँग्रेस), माणिक बाबु शिंदे (अपक्ष),  गोरख तुकाराम कांबळे (अपक्ष), कोल्हापूर उत्तर- सतीशचंद्र बाळकृष्ण कांबळे (सीपीआय) 1, शाहूवाडी- सत्यजीत बाबासो पाटील (शिवसेना)  हातकणंगलेमध्ये- प्रदीप भिमसेन कांबळे (अपक्ष), चंद्रशेखर सदाशिव कांबळे (बहुजन समाज पार्टी),   इचलकरंजी- मतदार संघात प्रकाश कल्लाप्पा आवाडे  (अपक्ष) 2 नामनिर्देशनपत्र दाखल केले. 
          जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात आजच्या दिवशी नामनिर्देशनपत्र घेतलेल्या इच्छुकांची नावे पुढील प्रमाणे-
            271 -चंदगड मतदार संघ-  अमर रामचंद्र चव्हाण-2, शिवप्रसाद अप्पासाहेब तेली-1, इश्वर संतु सावंत (विद्याधर बाबुराव गुरबे-2), इश्वर संतु सावंत (विद्याधर बाबुराव गुरबे-2), सोमगोंडा पदाप्पा आरबुळे-2, राजेंद्र शामराव गड्यानावर-2, संतोष धोंडीराम बेलवाडे (प्रकाश तुकाराम बेलवाडे-1) , चेतन व्यंकटेश शेनेगार (नंदकुमार पांडुरंग ढेरे-1) अशा 8 जणांनी  13 नामनिर्देशनपत्र घेतले.
             272- राधानगरी मतदार संघ- बाळासो बाजीराव पाटील-2, संदीप लक्ष्मण चौगुले-4, शरद दिनकर पाडळकर-1, सर्जेराव भाऊसो देसाई-4, संजय आनंदा सावंत-4, कृष्णा हणमंत देसाई-4, सुभाष बापू इंगवले-1, संदेश पांडुरंग भोपळे-1, जीवन पांडुरंग पाटील-4, नामदेव आबाजी पाटील-2, अक्षय आनंदा चरापले-1, शंकर सखाराम कोपार्डेकर-1, दिनकर रामचंद्र चांदम-4, निवास गणपती हुजरे-2 अशा  14 जणांनी 35 नामनिर्देशनपत्र घेतले.
        273- कागल मतदार संघ- मोहन दत्तू गिरी  (सुयेशा अमरिशसिंह घाटगे-4), रमेश बबन कांबळे (आनंदा लक्ष्मण कांबळे-4), विजय तुकारा कांबळे-2, मोहन दत्तात्रय पाटील-2 अशा 4 जणांनी 12 नामनिर्देशनपत्र घेतले.
        274- कोल्हापूर (दक्षिण) मतदार संघ- संजय भिकाजी मागाडे-2, शंकर कृष्णा कवलवे-2, शाहाजी नामदेव सुतार-1, सुभाष बळीराम रामुगडे-1  अशा 4 जणांनी  6 नामनिर्देशनपत्र घेतले..  
            275- करवीर मतदार संघ- अरविंद भिवा माने (बुध्दीसागर अरविंद माने यांच्यासाठी-1) अशा एकाने 1 नामनिर्देशनपत्र घेतले.
            276- कोल्हापूर उत्तर मतदार संघ- राजेश विनायक क्षीरसागर-2, वैषाली राजेश क्षीरसागर-2, सत्यजीत शिवाजीराव कदम-2, संजयसिंह अरविंद संकपाळ-1, संजय भिकाजी मागाडे-1, शिवाजी बाबुराव माळी-1,तेजश्री शिरीष पुणतांबेकर-1, अवधुत महादेव पाटील-1 अशा 8 जणांनी 11 नामनिर्देशनपत्र घेतले.
        277- शाहूवाडी मतदार संघ- राजेंद्र गोविंद देशमाने-2, जयसिंग रामचंद्र पाटील-2, विनायक दिनकर गुजर-2, विनायक दिलीप जाधव-2, यशवंत शिवाजी घाटगे-2, संतोष केरबा खोत-2, आनंदाराव वसंतराव सरनाईक-2, सत्यजीत विलासराव पाटील-2, संजय बापुसाहेब जाधव-2, नेताजी वामनराव भोसले-2, वसंत हिंदुराव गायकवाड-1 अशा 11 जणांनी 21  नामनिर्देशनपत्र घेतले.
            278- हातकणंगले (अ. जा.राखीव) मतदार संघ- प्रमोद मधुकर कदम-1, प्रमोद मधुकर कदम-1, दिपक आण्णासो पाटील (डॉ. सुजित वसंतराव मिणचेकर यांच्यासाठी-2), दत्ताजीराव विजयसिंह नाईक-निंबाळकर (डॉ. सुजितकुमार वसंतराव मिणचेकर यांच्यासाठी-1), दशरथ येदू माने-1, प्रेमकुमार आनंदराव माने-1, सचिन कोंडीराम शिंदे (दशरथ येदू माने यांच्यासाठी-1), रुपेश किरण कांबळे (प्रेमकुमार आनंदराव माने यांच्यासाठी-1), शितल विजय कांबळे (जयकुमार मंगलराव माळगे यांच्यासाठी-1), शितल विजय कांबळे (जयकुमार मंगलराव माळगे यांच्यासाठी-1) नामदेव लक्ष्मण कांबळे (मंगलराव जिन्नाप्पा माळगे यांच्यासाठी-1), नामदेव लक्ष्मण कांबळे (मंगलराव जिन्नाप्पा माळगे यांच्यासाठी-1, जिनेंद्र रामचंद्र ठोंबरे (भिमराव ऊर्फ भरमा लगमाण्णा कांबळे यांच्यासाठी-1), नुर महम्मद अजमसाभ बेलकुडे (भिमराव ऊर्फ भरमा लगमाण्णा कांबळे यांच्यासाठी-1), संतोष सदाशिव सोनवणे (जयवंतराव गंगाराम आवळे यांच्यासाठी-2), अरुण मारुती लोंढे (मालती रामचंद्र लोखंडे-2), दत्तात्रय नाना खोत-1, राहूल राजीव आवळे (राजीव किसनराव आवळे यांच्यासाठी-2), राहूल राजीव आवळे (राजीव किसनराव आवळे यांच्यासाठी-1), भुपाल मारुती मराठे (स्मिता राजीव आवळे यांच्यासाठी-1), शिवाजी परसु कांबळे-1, प्रविण आनंदराव माळी (शिवाजी परसु कांबळे यांच्यासाठी-1), रवींद्र शंकर खाडे (डॉ. अविनाश जयवंत सावर्डेकर यांच्यासाठी-1), रणजित राजाराम किळूसकर-1 अशा 24 जणांनी 27 नामनिर्देशनपत्र घेतले.
            279 - इचलकरंजी मतदार संघ- विलास रामचंद्र सुतार-1, राजू शिवाजी निर्मले-1, बालमुकुंद दत्तात्रय व्हनुगरे-1, संतोश दत्तात्रय कोळी ऊर्फ बाळ महाराज-3, फारुक महम्मदअल्ली कोल्हापुरी-1, राहूल प्रकाश खंजिरे-4, सुरेश लक्ष्मण पाटील-1, रमेश कृष्णा पाटील-1, मिलींद रामचंद्र कुलकर्णी-4, ॲड. जयंत आनंदराव बच्छुगडे-1, गजानन रामचंद्र हाके-4, सुरेश गणपतराव हाळवणकर-4, भारती सुरेश हाळवणकर-1, प्रा. डॉ. दत्तात्रय सुभाष जाधव-1, अशा 14 जणांनी  28 नामनिर्देशनपत्र घेतले.
            280- शिरोळ मतदार संघ- अवधुत सदाशिव बिरंजे, राहूल बाबासो बंडगर (राजेंद्र शामगोंड पाटील यांच्यासाठी), प्रतापराव ऊर्फ बाबा शामराव पाटील (राजेंद्र शामगोंडा पाटील यांच्यासाठी), विजय दत्तात्रय राऊत, उदय सप्पाराम झुयळ, प्रभाकर राजराम निर्मल, विश्वास विठ्ठल काळे, भाऊसो मल्लाप्पा मगदुम, संदीप निवृत्ती बिरणगे (प्रमोद सुरेश पाटील यांच्यासाठी), दिलीप बाबगोंडा पाटील (बाबगोंडा आप्पा पाटील), अमिर रहिमान नदाफ, अस्लम ऐनुद्दीन मुल्ला, संकेत सुभाष मगदूम (उल्हास संभाजी पाटील यांच्यासाठी), परशुराम तमन्ना माने  अशा 14 जणांनी 26 नामनिर्देशनपत्र घेतले.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.