सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९

चंदगड, शाहूवाडी पोलीस ठाणे हद्दीत पोलीस पथकाचे पदसंचलन



कोल्हापूर,दि. 14 (जि.मा.का.) : विधानसभा निवडणुकीत मतदरांना निर्भयपणे मतदान करता यावे यासाठी चंदगड आणि शाहूवाडी पोलीस ठाणे हद्दीत पोलीस पथकाने लाठी, ढाल, हेल्मेटसह पदसंचलन केले. चदंगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सातपुते आणि शाहूवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांनी पदसंचलन दरम्यान लोकांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन केले.
चंदगड पोलीस ठाणे हद्दीत चंदगड शहर, हलकर्णी फाटा, पाटणे फाटा, माणगाव, कोवाड, आडकुर येथे चंदगड येथे पदसंचलन केले. या  पद संचलनात कोल्हापूर पोलीस दलाचे 2 पोलीस अधिकारी, 10 पोलीस कर्मचारी, राखीव पोलीस बलाचे 1 अधिकारी 20 कर्मचारी व 30 होमगार्ड यांचा सहभाग होता. शाहूवाडी पोलीस ठाणे हद्दीत बांबवडे व सरुड परिसरात 5 पोलीस अधिकारी, राज्य राखीव पोलीस दलाचे 80 कर्मचारी, 25 पोलीस कर्मचारी व 45 हामगार्ड यांनी पदसंचलनात सहभाग घेतला.  
0 0 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.