कोल्हापूर, दि. 30
(जिमाका) : केंद्र शासनाच्या ईज (EASE) अन्वये बँकिंगमधील सुधारणांच्या अंतर्गत
ग्राहकांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक शाखांच्या वर्गीकरणानुसार कामकाजाची वेळ
एकसमान केली आहे. शुक्रवार दिनांक 1 नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे,
अशी माहिती अग्रणी जिल्हा व्यवस्थापक राहुल माने यांनी दिली.
इंडियन बँक
असोशिएशनने 6 ऑगस्ट 2019 च्यापत्राव्दारे ग्राहकांसाठी देशामधील राष्ट्रीयकृत बँक
शाखांच्या वेळेत तीन प्रकारे वर्गीकरण केले असून ते आता देशात लागू होणार आहे.
राज्यस्तरीय बँकर्स समितीने आयबीएचा आदेश आणि जिल्हा बँक व्यवस्थापकांनी प्रत्येक
सार्वजनिक बँकेनी सूचना केल्यानुसार जिल्ह्यातील सार्वजनिक बँकांसाठी पुढीलप्रमाणे
कामकाजाच्या वेळेत तीन प्रकारे वर्गीकरण
केले आहे.
रहिवासी क्षेत्र- बँकांची वेळ - सकाळी 9 ते दुपारी 4,
ग्राहकांसाठी सकाळी 9 ते दुपारी 3,
व्यापारी क्षेत्र- बँकांची वेळ- सकाळी 11 ते संध्याकाळी 6,
ग्राहकांसाठी सकाळी 11 ते संध्याकाळी 5.
इतर व कार्यालयासाठी- सकाळी 10 ते संध्याकाळी 5, ग्राहकांसाठी
सकाळी 10 ते दुपारी 5.
जिल्हा तसेच शाखानिहाय बँकेच्या वेळेचा तपशिल बँक ऑफ
महाराष्ट्राच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रत्येक शाखेनी त्यांच्या कामकाजाच्या
वेळा सूचना फलकाव्दारे प्रदर्शित करावयाच्या आहेत. बँक कामकाजाच्या बदललेल्या
वेळेची अंमलबजावणी शुक्रवार दिनांक 1 नोव्हेंबर 2019 पासून लागू होत आहे. याबाबत
ग्राहकांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही श्री. माने यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.