गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१९

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) 33010 कापडी पिशव्यांचे वाटप - बाळासाहेब झिंजाडे “स्वच्छता ही सेवा” उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा


  


कोल्हापूर दि. 3 (जि.मा.का.): स्वय-माविमस्थापित स्वयंसहाय्यता महिला बचत गटातील महिलांनी 33010 कापडी पिशव्या बनविल्या असून खऱ्या अर्थाने प्लास्टिक बंदीबरोबरच महिलांना देखील रोजगार उपलब्ध झालेला आहे  व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे . स्वच्छता ही सेवा हा कार्यक्रम जास्तीत- जास्त महिलांकडे कसा जाईल यासाठी माविमच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सहाय्यता बचत गटातील महिलांनी प्लास्टिकचा वापर बंद करुन कुटुंबासोबत परिसराचीही स्वच्छता करावी, असे आवाहन महिला व आर्थिक विकास महामंडळाचे (माविम) चे जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे यांनी केले   
   . २ ऑक्टोबर  रोजी महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त  स्वच्छता हीच सेवा हा उपक्रम महिला व आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या वतीने राबविण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते यावेळी लेखाधिकारी विनायक कुलकर्णी सहा. संनियंत्रण अधिकारी श्री उमेश लिंगनूरकर, लेखा सहाय्यक विजय कलकुटकी, सारिका पाटील, जितेंद्र जाधव  व माविम स्थापित सर्व लोकसंचलित साधन केंद्रातील सर्व कार्यकारणी , व्यवस्थापक लेखापाल, क्षेत्रीय समन्वयक ,क्षमता वृद्धी समन्वयक ,उपजीविका समन्वयक,सर्व सहयोगिनी ,सी आर पी,वस्तीस्तर संघ, व बचत गटातील महिला उपस्थित होत्या.
यावेळी बाळासाहेब झिंजाडे म्हणाले, माविम स्थापित महिला स्वयंसहाय्यता बचत गटातील महिलांनी प्लास्टिकचा वापर करू नये. जास्तीत जास्त महिलांनी कापडी पिशव्या, इको फ्रेडली बंग यांचा वापर मोठ्या प्रमाणात करावा. प्लास्टीकमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास व भेडसावणारे अनेकविध प्रश्न कमी करण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे. कुटुंब व आपला परिसर प्लास्टिकमुक्त कसा होईल याकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावे. याकरिता माविमच्या माध्यमातून बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या कापडी पिशवी ही महानगरपालिका ,नगरपरिषद ,जिल्हा परिषद शाळा ,आश्रमशाळा दिव्यांग या ठिकाणी मोफत कापडी पिशवी वाटप करून प्लास्टिक बंदीबाबत जनजगृती व कापडी पिशव्याचा  वापर करावा. महानगरपालिका व नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात ३३०१० कापडी पिशव्या विद्यार्थांना मोफत वाटप करण्यात आल्या आहेत. प्लास्टिकच्या अवास्तव वापर केल्यामुळे निर्माण होत असलेले प्रदूषण , प्लास्टिकमुळे भेडसावणारे विविध प्रश्न, अडी अडचणी यावर माविम स्टाफ व लोकसंचलित साधन केंद्रातील स्टाफ जनतेमध्ये जावून सविस्तर मार्गदर्शन करीत आहे. प्लास्टिकचा वापर करू नये असे आवाहनही करीत आहे. त्याच बरोबर महानाग्पालिका व नगरपरिषद कार्यक्षेत्रात महिला स्वयंसहाय्यता बचत गटातील महिला रॅली काढून स्वच्छतेबाबत जाणीवजागृती करून जनतेमध्ये स्वच्छतेचा कानमंत्र देत आहेत.त्यामुळे यया कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असे सांगून श्री. झिंजाडे म्हणाले, प्लास्टिक बंदीच्या धर्तीवर कापडी पिशवी  अंमलबजावणी व जनजागृती करणे हा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी हा कार्यक्रम कोल्हापूर महानगरपालिका व इचलकरंजी नगरपरिषद , गडहिंग्लज नगरपरिषद , जयसिंगपूर नगरपरिषद, कसबा वडगाव नगरपरिषद , कागल नगरपरिषद, मुरगूड नगरपरिषद व कुरुंदवाड नगरपालिका च्या कार्यक्षेत्रात घेण्यात आला.
यावेळी राष्ट्रपिता  महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमामध्ये दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) अंतर्गत माविम स्थापित महिला स्वयंसहाय्यता बचत गटातील महिलांनी  स्वच्छतेची शपथ घेली.
00000
             


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.