मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१९

जिल्ह्यात 74.08 टक्के मतदान सर्वाधिक करवीरमध्ये तर कोल्हापूर उत्तरमध्ये सर्वात कमी



कोल्हापूर, दि. 22 (जि.मा.का.) : जिल्ह्यात काल झालेल्या मतदाना दिवशी  एकूण 74.08 टक्के मतदान झाले. करवीर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 83.93 टक्के मतदानाची नोंद झाली, तर सर्वात कमी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात 60.87 टक्के मतदान झाले.
जिल्ह्यात काल झालेल्या मतदानाची आकडेवारी विधानसभा मतदार संघ निहाय पुढीलप्रमाणे आहे.
चंदगड विधानसभा मतदार संघ-68.59 टक्के.  राधानगरी -75.14, कागल - 81,  कोल्हापूर दक्षिण-74.57,  करवीर -83.93, कोल्हापूर  उत्तर  -60.87,  शाहूवाडी -79.90, हातकणंगले -73.10,  इचलकरंजी - 68.38  आणि शिरोळ विधानसभा मतदार संघात 74.41 टक्के मतदान झाले आहे.
जिल्ह्यातील एकूण 15 लाख 85 हजार 386 पुरूष मतदारांपैकी 11 लाख 94 हजार 563 जणांनी काल मतदान केले. 15 लाख 7 हजार 576 महिला मतदारांपैकी 10 लाख 96 हजार 625 मतदारांनी आपला हक्क बजावला. तर एकूण 81 इतर मतदारांपैकी 21 जणांनी काल मतदान केले.
मतदारसंघनिहाय पुरूष, महिला आणि इतर मतदारांनी केलेले मतदान पुढीलप्रमाणे- चंदगड- पुरूष 1 लाख 7 हजार 839, महिला 1 लाख 10 हजार 997, इतर 1. राधानगरी पुरूष 1 लाख 26 हजार 544, महिला 1 लाख 18 हजार 158. कागल - पुरूष 1 लाख 32 हजार 827, महिला 1 लाख 28 हजार 663. कोल्हापूर दक्षिण- पुरूष 1 लाख 26 हजार 64, महिला 1 लाख 15 हजार 898, इतर 2. करवीर- पुरूष 1 लाख 34 हजार 993, महिला 1 लाख 19 हजार 653, इतर 1. कोल्हापूर उत्तर- पुरूष 92 हजार 840, महिला 81 हजार 356, इतर 2. शाहूवाडी- पुरूष 1 लाख 19 हजार 352, महिला 1 लाख 10 हजार 458, इतर 1. हातणंगले- पुरूष 1 लाख 25 हजार 609, महिला 1 लाख 6 हजार 684, इतर 4. इचलकरंजी- पुरूष 1 लाख 6 हजार 414, महिला 94 हजार 134, इतर 9 आणि शिरोळ-  पुरूष 1 लाख 22 हजार 81, महिला 1 लाख 10 हजार 624, इतर 1.
जिल्ह्यातील एकूण 30 लाख 93 हजार 43 मतदारांपैकी 22 लाख 91 हजार 209 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
0 00 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.