कोल्हापूर,दि. 19
(जि.मा.का.) : कागल आणि कोल्हापूर दक्षिण
विधानसभा मतदार संघातील उमेदवारांनी केलेल्या दैनंदिन खर्चाच्या लेख्यांच्या
तिसऱ्या तपासणीत नऊ उमेदवारांच्या खर्चात तफावत आढळून आल्याचे संबंधित मतदार
संघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
273-कागल विधानसभा मतदार संघातील उमेदवार मुश्रीफ
हसन मियालाल यांचा छायांकित निरीक्षण नोंदवहीनुसार 13 लाख 96 हजार 708 रुपये तर
उमेदवाराच्या नोंदवहीनुसार 13 लाख 40 हजार 112 रुपये नोंदविला आहे. यामध्ये 56 हजार 596 रुपये खर्चाची तफावत आढळून आली.
उमेदवार रवींद्र तुकाराम कांबळे यांचा छायांकित निरीक्षण नोंदवहीनुसार 13 हजार 963
रुपये तर उमेदवाराच्या नोंदवहीनुसार 13 हजार 903 रुपये नोंदविला आहे. यामध्ये 60
रुपये खर्चाची तफावत आढळून आली. उमेदवार संजय आनंदराव घाटगे यांचा छायांकित
निरीक्षण नोंदवहीनुसार 8 लाख 59 हजार 94 रुपये तर उमेदवाराच्या नोंदवहीनुसार 7
लाख 15 हजार 683 रुपये नोंदविला आहे. यामध्ये
1 लाख 43 हजार 411 रुपये खर्चाची तफावत आढळून आली. सिध्दार्थ आबासो नागरत्न
यांचा छायांकित निरीक्षण नोंदवहीनुसार 60 हजार 104 रुपये तर उमेदवाराच्या
नोंदवहीनुसार 37 हजार 294 रुपये नोंदविला आहे. यामध्ये 22 हजार 810 रुपये खर्चाची तफावत आढळून आली. उमेदवार
समरजितसिंह विक्रमसिंह घाटगे यांचा छायांकित निरीक्षण नोंदवहीनुसार 11 लाख
58 हजार 132 रुपये तर उमेदवाराच्या नोंदवहीनुसार 10 लाख 70 हजार 171 रुपये नोंदविला
आहे. यामध्ये 87 हजार 961 रुपये खर्चाची तफावत आढळून आली.
274-
कोल्हापूर (दक्षिण) विधानसभा मतदार संघातील उमेदवार अमल महाडिक यांचा छायांकित
निरीक्षण नोंदवहीनुसार 15 लाख 33 हजार 844 रुपये तर उमेदवाराच्या नोंदवहीनुसार 2
लाख 94 हजार 734 रुपये इतका खर्च नोंदविला आहे. यामध्ये 12 लाख 39 हजार 110 रुपये
खर्चाची तफावत आढळून आली. उमेदवार ऋतुराज संजय पाटील यांचा छायांकित निरीक्षण
नोंदवहीनुसार 11 लाख 58 हजार 449 रुपये तर
उमेदवाराच्या नोंदवहीनुसार 4 लाख 91 हजार 519 रुपये इतका खर्च नोंदविला आहे.
यामध्ये 6 लाख 66 हजार 929 रुपये खर्चाची तफावत आढळून आली. उमेदवार सचिन आप्पासो
कांबळे यांचा छायांकित निरीक्षण नोंदवहीनुसार
35 हजार 498 रुपये तर उमेदवाराच्या नोंदवहीनुसार 30 हजार 205 रुपये इतका
खर्च नोंदविला आहे. यामध्ये 5 हजार 293 रुपये खर्चाची तफावत आढळून आली. उमेदवार
बबनराव ऊर्फ दिलीप पांडुरंग कावडे यांचा छायांकित निरीक्षण नोंदवहीनुसार 57 हजार 755 रुपये तर उमेदवाराच्या
नोंदवहीनुसार 52 हजार 678 रुपये इतका खर्च नोंदविला आहे. यामध्ये 5 हजार 77 रुपये
खर्चाची तफावत आढळून आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.