मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१९

पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टिक वस्तूंचा त्याग करा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आवाहन




कोल्हापूर दि. 1 :-  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने  स्वच्छता एक सेवाहा उपक्रम राबविण्यात येत असून  नागरीकांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टिक वस्तूंचा त्याग करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी  केले.
‘स्वच्छता ही सेवा’ ही मोहिम ११ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत  राबविण्यात येत आहे. या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना,  मी सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करणार नाही. मी सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तूंचा त्याग करुन विश्व पर्यावरण रक्षणात माझेही योगदान देईन. माझी हीच कृती बापुजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिलेली आदरांजली असेल, अशी शपथ दिली.  यावेळी उपविभागीय अधिकारी श्रावण क्षीरसागर, महापालिकेचे नितीन देसाई यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
००००


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.