कोल्हापूर, दि.
7 (जिमाका) : निवडणुकीच्या प्रचारासाठी समाजमाध्यमांचा मोठ्या
प्रमाणात वापर केला जातो, त्यामुळे समाज मध्याम प्रचारावरील बारकाईने लक्ष ठेवावे,
अशा सूचना खर्च निरीक्षक शील आशीष यांनी दिल्या.
खर्च निरीक्षक श्री. अशीष यांनी आज जिल्हास्तरीय
माध्यम कक्षास भेट देऊन कक्षाकडील कामकाजाची
माहिती घेतली. प्रसार माध्यम कक्षाचे नोडल
अधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी कक्षाकडील सोशल मीडिया, पेडन्यूज,
सायबर सेल, जाहिरात प्रमाणिकरण, जाहिरात खर्च विषयक कामकाजाची माहिती दिली. सहायक नोडल
अधिकारी एस.आर.माने यांनी स्वागत केले.
श्री. अशीष म्हणाले, विधानसभा निवडणुकीचा प्रचार
समाजमाध्यमांवरुन गतीने होत आहे. यासाठी निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांच्या समाजमाध्यम
खात्यावरुन होणाऱ्या प्रचारावर प्रसारमाध्यम कक्षाने बारकाईने लक्ष देणे जरुरीचे
आहे. या माध्यमांवरुन निवडणूक प्रचारासाठी
केलेला खर्च उमेदवारांच्या खर्चात समाविष्ट करण्याबाबतची कार्यवाही करावी, असे ते म्हणाले. जिल्हास्तरीय प्रसार माध्यम कक्षात
सोशल मीडिया, पेडन्यूज, सायबर सेल, जाहिरात प्रमाणिकरण, जाहिरात खर्च विषयककामे उत्तम
रितीने होत असल्याबद्दल खर्च विषयक निरीक्षक शील आशीष यांनी समाधान व्यक्त केले. यापुढेही
अधिक दक्षतेने कामकाज व्हावे, असेही ते म्हणाले
यावेळी प्रसार माध्यम कक्षातील सहायक प्राध्यापक डॉ. शिवाजी
जाधव, असिस्टंट प्रोफेसर व्ही.एस.कुंभार, मुख्य लेखाधिकारी संजय सरनाईक, वरिष्ठ लेखा
परीक्षक मिलिंद यशवंत पाटील, माहिती सहाय्यक एकनाथ पोवार, राज्यकर निरीक्षक राजाराम कोळी, राज्यकर निरीक्षक
कमलेश तांदळे, राज्यकर निरीक्षक योगेश पाडुरंग कुल्लाळ, सायबर तज्ञ अमर अडसुळ, सायबर
तज्ञ अनिल बरगे, सांखिकी सहायक किरण देशपांडे, अव्वल कारकून सुरेखा पोळ, साऊंड रेकॉर्डीस्ट सतीश शेंडगे, छायाचित्रकार रोहित कांबळे, दुरमुद्रणचालक-नि-टंकलेखक
रवींद्रकुमार चव्हाण, सर्वसाधारण सहायक सचिन अशोक वाघ, लिपिक-नि-टंकलेखक सतीश आनंदा कोरे,
रघुनाथ तुकार कांबळे,
अनिल मालोजीराव यमकर, प्रकाश कांबळे, रावसाहेब हिंदूराव पाटील, साक्षी मोरे, रंगराव
मोरे, स्वप्नाली कुंभार, प्रकाश चव्हाण आणि मनोज साठे उपस्थ्ति होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.