कोल्हापूर,दि. 9 (जि.मा.का.) : फिरत्या लोक अदालतीमुळे पक्षकारांमधील कटुता कमी
होऊन समाजात सलोखा वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर पक्षकारांचा वेळ व पैसा यांची बचत
होणार असल्याने फिरती लोक अदालत हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन जिल्हा विधी
सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.व्ही.न्हावकर यांनी
केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत न्याय आपले दारी फिरते लोक अदालत व जागतिक मानसिक
आरोग्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचा शुभारंभ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.व्ही.न्हावकर
यांच्या हस्ते करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे
सचिव न्यायाधीश पंकज देशपांडे, न्यायाधीश श्री. शेळके, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष
रणजित गावडे, उपाध्यक्ष जे.व्ही. पाटील, महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचे सदस्य
ॲड. विवेक घाटगे यांच्यासह न्यायिक अधिकारी उपस्थित होते.
फिरत्या
लोक अदालत शुभारंभ प्रसंगी निवृत्त जिल्हा
न्यायाधीश ए.के.पाटील, प्रा. बी.एम.पाटील, पॅनेल वकील योगिता हरणे, विधी स्वयंसेवक
फ्रान्सिस्का डिसोझा यांनी उपस्थित पक्षकारांमधील समस्या चर्चेला घेवून त्याविषयी समूपदेशन
व सल्ला दिला. फिरत्या लोक अदालत कार्यक्रम
नियोजनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे ज्ञानेश्वर मिरजकर,गुरूदास येळवडेकर,बाळासाहेब
खुपीरेकर,सारीका शिंदे,सुवर्णा पाटील,फिरोज पखाली यांनी योगदान दिले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.